Posts

मुल्यशिक्षण : काळाची गरज

                मूल्यशिक्षण : काळाची गरज           आज आपण वर्तमानपत्र उघडला की बातमी दिसते ती अल्पवयीन मुलांनी केलेल्या गुन्हांची . खून, चोरी ' बलात्कार ' वाईट व्यसने या सर्वांमध्ये अल्पवयीन मुले सहभागी झालेली दिसतात. ही मुले वाईट विकृतींना बळी पडताना दिसत आहेत . सामाजिक स्तरांवर दिवसेंदिवस वाढत चाललेली अनैतिकता हा एक सामाजिक भूकंप आहे . त्याचे दुष्परिणाम भयानक असून शाळांमधून दिले जाणारे मूल्य शिक्षण हाच त्यावरील उपाय आहे. मूल्यशिक्षण ही मुख्यतः काळाची गरज आहे आणि अध्ययन अध्यापनातून ते सहजपणे साध्य करता येईल . इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत आपण १० मूल्ये प्रतिनिधिक मानली असली तरी सदाचाराने वळण लावण्याचा उद्देश लक्षात घेता मूल्यविचार मर्यादित राहू शकत नाही आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल संगणक इ .च्या अति आहारी जाऊन समाजाची नैतिकता ढासळत चालली आहे. त्यासाठीच खरेतर मूल्यशिक्षणाची खऱ्या अर्थाने गरज आहे .                 दैनिक परिपाठ हे मूल्यशिक्षणासाठी अत्यंत प्रभावी माध्यम आहे. स...