मुल्यशिक्षण : काळाची गरज

                मूल्यशिक्षण : काळाची गरज     

     आज आपण वर्तमानपत्र उघडला की बातमी दिसते ती अल्पवयीन मुलांनी केलेल्या गुन्हांची . खून, चोरी ' बलात्कार ' वाईट व्यसने या सर्वांमध्ये अल्पवयीन मुले सहभागी झालेली दिसतात. ही मुले वाईट विकृतींना बळी पडताना दिसत आहेत . सामाजिक स्तरांवर दिवसेंदिवस वाढत चाललेली अनैतिकता हा एक सामाजिक भूकंप आहे . त्याचे दुष्परिणाम भयानक असून शाळांमधून दिले जाणारे मूल्य शिक्षण हाच त्यावरील उपाय आहे. मूल्यशिक्षण ही मुख्यतः काळाची गरज आहे आणि अध्ययन अध्यापनातून ते सहजपणे साध्य करता येईल . इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत आपण १० मूल्ये प्रतिनिधिक मानली असली तरी सदाचाराने वळण लावण्याचा उद्देश लक्षात घेता मूल्यविचार मर्यादित राहू शकत नाही आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल संगणक इ .च्या अति आहारी जाऊन समाजाची नैतिकता ढासळत चालली आहे. त्यासाठीच खरेतर मूल्यशिक्षणाची खऱ्या अर्थाने गरज आहे .
                दैनिक परिपाठ हे मूल्यशिक्षणासाठी अत्यंत प्रभावी माध्यम आहे. सहशालेय उपक्रमात बदलत्या काळानुसार इष्ट तो बदल घडवून आणण्याची शक्ती मूल्यसंस्कारातून वाढू शकते. घर आणि समाज यांची भूमिका मूल्यशिक्षणाच्या दृष्टीने महत्वाची आहे. घरावर मूल्यशिक्षणाची जबाबदारी अधिक आहे. आणि शाळा ही समाजाची छोटी प्रतिकृती असल्यामूळे शाळेतील चरित्र्य संवर्धनाचे उपक्रम व्यापकदृष्ट्या परिणामकारक ठरणारे आहेत. म्हणूनच ब्रिली ग्रॅहमचे " If charater is lost everything is lost !" हे वचन शाळां शाळांमधून शिकवण्याची गरज भासते आहे .

◾ मूल्य शिक्षणाचे महत्व : -
१) आपल्या देशात विविध धर्माची लोक राहतात. प्रत्येक धर्माचे पारंपरिक उत्सव वेगळे आहेत तथापि प्रत्येक धर्माची शिकवण मानवतेच्या कल्याणाचीच आहे, यावर भर देणे आवश्यक आहे. त्यासाठीच आज सर्वधर्म सहिष्णूता हे मूल्य रुजवणे हितावह ठरेल .

२) राष्ट्रभक्ती व राष्ट्रीय एकात्मता या गोष्टी रुजवतांना राष्ट्रभक्ती संदर्भात पावनखिंड लढविणारे बाजीप्रभू , स्वातंत्र्यवीर सावरकर , अन्य देशभक्तांच्या राष्ट्रभक्तीची तसेच रणांगणावर लढणाऱ्या सैनिकांची उदाहरणे प्रभावी ठरतील . स्त्री पुरुष समानता या अंतर्गत मूलगा मुलगी समान हे समाज मनावर बिंबवणे आवश्यक झाले आहे , यातून स्त्री भ्रुणहत्या ही सामाजिक विकृती नष्ट होऊ शकते . कोणत्याच कामात मुली किंवा स्त्रिया मुलांपेक्षा पुरुषांपेक्षा कमी नाहीत हे लक्षात घेतले पाहिजे. 

३) कोणतेही काम कष्टाचे नाही आणि कष्टाचे काम करणारा हलक्या दर्जाचा नाही हे समजवण्यासाठी श्रमप्रतिष्ठा हे मूल्य रुजवणे आवश्यक आहे. स्वच्छता नीटनेटकेपणा संबंध श्रमप्रतिष्ठेशी जोडता येतो .

४) सौजन्यशीलता या मूल्याचा संबंध व्यक्तिच्या दैनंदिन आचरणाशी अधिक आहे.

५) आज अनैतिक , आतंकवाद, भ्रष्टाचार , बलात्कार सारख्या . सामाजिक विकृती इ .चे पडसाद देशभर ऐेकू येत आहेत. त्यांचे उच्चाटन होण्यासाठी मूल्यशिक्षण ही आजच्या काळाची गरज बनली आहे . म्हणूनच हे सर्व मुलांमध्ये बिंबवले तर देशाचे सुजाण सुसंस्कारी भावी नागरिक घडतील यात शंकाच नाही .


Comments

Post a Comment